Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला २१ मोदकच का अर्पण केले जातात? जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

मोदक

गणपती बाप्पांचे आवडते अन्न मोदक मानले जाते, म्हणून भक्त त्यांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

अत्यंत शुभ अंक

हिंदू धर्मात २१ हा अत्यंत शुभ अंक मानला जातो, जो जीवनातील पूर्णता, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानला जातो.

२१ घटकांची

शरीरातील ५ प्राण, ५ कर्मेंद्रिये, ५ ज्ञानेंद्रिये, ५ तन्मात्रा आणि आत्मा मिळून २१ घटकांची रचना होते.

श्रद्धा, प्रेम

२१ मोदक अर्पण म्हणजे भक्त आपली पूर्ण श्रद्धा, प्रेम आणि समर्पण भावनेने गणपती बाप्पांना अर्पण करतो असा अर्थ आहे.

कर्म शुद्ध होतात

धार्मिक मान्यतेनुसार, २१ मोदक अर्पण केल्याने भक्ताचे मन, वाणी आणि कर्म शुद्ध होतात आणि जीवनात सकारात्मकता येते.

सुख-समृद्धी

मान्यता अशी आहे की, गणपतीला २१ मोदक अर्पण केल्याने घरात धन, धान्य आणि सुख-समृद्धी कायम टिकून राहते.

वेद-पुराणांपासूनची परंपरा

वेद-पुराणांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही जपली जाते. भक्त २१ मोदक अर्पण करून गणपतीचे आशीर्वाद मिळवतात.

NEXT: गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने कोणते फायदा होतात?

येथे क्लिक करा