Ruchika Jadhav
कुलचा असा पदार्थ आहे जो कोणत्याही भाजीसोबत आणि आमटीसोबत खाता येतो.
ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा कुलचा सर्वांनाच बनवता येत नाही. त्यामुळे आज त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
कुलचा बनवण्यासाठी सर्वात आधी बारीक पीठ असलेला मैदा घ्या.
मैद्याच्या पिठामध्ये एक वाटी दही घ्या आणि पिठात छान मिक्स करून घ्या.
कुलचा बनवण्यासाठी तेल फार महत्वाचं आहे. त्यामुळे ३ चमचे तेल सुद्धा पिठामध्ये टाकून घ्या.
या पिठामध्ये बेकींग सोडा सुद्धा मिक्स करा. त्याने कुलचा फुलतो.
तुम्ही हे पिठ मळण्यासाठी पाणी किंवा दूध वापरू शकता. दूध नसल्यास दूध पावडर सुद्ध यात मिक्स करता येते.
त्यानंतपर तयार पिठाचे छान कुलचे बनवून तव्यावर मस्त शेकून घ्या.