Kaju Curry : पावसात घ्या झणझणीत 'काजू करी' चा आस्वाद, रेस्टॉरंट ची चव विसराल

Shreya Maskar

पाऊस

पावसाळ्यात जेवणात गरमागरम झणझणीत पदार्थ खायला अनेकांना आवडतात.

rain | Yandex

काजू करी

पावसात पौष्टिक काजू पासून बनवा चटपटीत काजू करी

cashew curry | Yandex

साहित्य

काजू करी बनवण्यासाठी भाजलेले काजू , टोमॅटो आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, दूध, तेल, कांदा, दालचिनी, धणे-जिरे पावडर, कसूरी मेथी पावडर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Material | Yandex

भाजलेले काजू

काजू करी बनवण्यासाठी सर्वप्रथम थोडे काजू भाजून त्याची जाडसर पेस्ट करून घ्यावी.

Roasted nuts | Yandex

कांदा- टोमॅटो परतून घ्या

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, चिरलेला कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या.

Saute onion-tomato | Yandex

कांदा- टोमॅटो पेस्ट

कांदा- टोमॅटोचे मिश्रण थंड झाल्या‌वर त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्या.

Onion-tomato paste | Yandex

सर्व मिश्रण एकत्र करा

आता एका पॅनमध्ये गरम तेल करून यामध्ये कांदा-मसाल्याची पेस्ट घाला. त्यानंतर यामध्ये काजू पेस्ट, लाल तिखट, धणे-जिरे पावडर,चवीनुसार मीठ घाला.

Mix all the ingredients together | Yandex

भाजलेले काजू

भाजीतील तेल वेगळे होईपर्यंत छान मिश्रण शिजवून घ्या. त्यात भाजलेले काजू टाका आणि भाजी शिजवून घ्या.

Roasted nuts | Yandex

दूध

आता या मिश्रणात दूध, पाणी मिसळा आणि झाकण ठेवून छान वाफ काढा.

milk | Yandex

कसूरी मेथी

शेवटी कसूरी मेथी घालून डिशची सजावट करा.

Kasuri Methi | Yandex

चपाती सोबत घ्या आस्वाद

गरमागरम चपाती सोबत काजू करीचा आस्वाद घ्या.

Cashew | Saam Tv

NEXT : पावसात चायनीज खाण्याचा मोह आवरेना, घरीच बनवा चटपटीत पनीर चिली

paneer chili | Yandex