Sakshi Sunil Jadhav
रंग माझा वेगळा या मालिकेतली लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने नुकतेच सोशल मीडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
रेश्मा शिंदेने २९ नोव्हेंबरमध्ये तिचा बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली.
रेशमा शिंदेचे रोमॅंटिक फोटो लग्न झाल्यापासून चाहत्यांच्या नेहमी चर्चेत येत असतात.
नुकतेच अभिनेत्री रेश्माने काही खास फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री रेश्मा शिंदे तिच्या सहकुटुंबासह आई तुळजाभवानीच्या दर्शनाला गेली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यात आहे.
आई तुळजाभवानीचे मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
फोटोमध्ये रेश्माने माहेरची साडी असेही कॅप्शन दिले आहे.
मंदिराजवळील बांगड्यांची खरेदी आणि विविध दुकानाचे फोटो पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.