Manasvi Choudhary
उद्या २६ जानेवारी २०२५ सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारात विविध तिरंगा रंगाच्या वस्तू पाहायला मिळतात.
याच दिवशी तुम्ही स्पेशल तिरंगा बर्फी रेसिपी ट्राय करा. तिरंगा बर्फी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सुकं खोबरं, तूप, बदाम, काजू, मनुका, दूध, वेलची पावडर, पिठीसाखर, खाण्याचा हिरवा रंग, नारळ पावडर हे साहित्य घ्या.
तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये सुकं खोबऱ्याचा किस, वेलची पावडर, दूध आणि पिठीसाखर हे मिश्रण एकत्रित करून घ्या
यानंतर या मिश्रणाचे तीन भाग करा एक भाग पांढरा ठेवा. तर दुसऱ्या भांगाला खाण्याचा केशरी रंग आणि खाण्याचा हिरवा रंग मिसळून पीठ एकत्रित करा
आता एका प्लेटवर थोडे तूप लावून त्यावर नारळ पावडर शिंपडा.
नंतर या तिरंगामधील रंगाच्या पिठाच्या गोळ्यांना आयताकृती आकार द्या.
अशाप्रकारे तुमची बर्फी तयार होण्यासाठी ४ ते ५ तास फ्रिजमध्ये ठेवा.
प्रजासत्ताक दिनी या गोड बर्फीचा आस्वाद घ्या.