ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२ कप बासमती तांदूळ, लंवग, काळीमिरी, तेजपत्ता, तूप, २ गाजर, १ टोमॅटो, ५ते ६ पालकची पाने, २ बारीक चिरलेले कांदा, पनीर, ४ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण, आलं, जीरे आणि तेल
एका पॅनमध्ये तूप गरम करुन त्यात जीरे, काळीमिरी ,लवंग आणि तेजपत्ता घालून पाणी उकळून घ्या. यात धुतलेले तांदूळ घालून भात ९० टक्के शिजवून घ्या. नंतर पाणी काढून भात मोकळा करा.
भाताचे तीन समान भाग करा. गरम पाण्यात गाजर थोडे शिजवून घ्या. गाजर, टोमॅटो आणि कश्मिरी लाल पावडर आणि आलं लसूण यांची पेस्ट तयार करा.
पालकची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या. शिजवलेले पालक, आलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिर यांची पेस्ट तयार करुन घ्या.
एका पॅनमध्ये थोडे जीरे, कांदा आणि पनीरचे टुकडे आणि मीठ घाला. त्यानंतर यात भात घाला. आणि चांगले मिक्स करुन घ्या.
केशरी भातासाठी तेलात आलं लसूण आणि गाजरची पेस्ट घालून परतून घ्या.यानंतर यात सेझवान चटणी, टोमॅटो सॅास आणि चवीनुसार मीठ घालून भात मिक्स करा. केशरी भात तयार आहे.
हिरव्या भातासाठी तेलमध्ये बारीक चिरलेले कांदा आणि आलं लसूण घाला आणि पालकची पेस्ट मिक्स करुन मसाला चांगला परतून घ्या.यामध्ये मीठ घालून पांढरा भात मिक्स करा. हिरवा भात तयार आहे.
तिरंगा पुलावासाठी सर्व्हिंग प्लेटमध्ये तिरंग्याप्रमाणे तिन्ही भात सजवून घ्या यावर अशोकचक्रासाठी लवंगाचा वापर करु शकता. या टेस्टा पुलाव तुम्ही काकडीसोबत सर्व्ह करु शकता.