Mamta Kulkarni : बॉलिवूड दिवा ते साध्वी! मोह-माया सोडत ममता कुलकर्णींनी घेतला संन्यास, किन्नर आखाड्याकडून कोणती उपाधी मिळाली?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ममता कुलकर्णी

बॅालिवूडची स्टारअभिनेत्री ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात परतली. त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभदरम्यान संन्यास घेतला आहे.

Mamta Kulkarni | google

ममता कुलकर्णीचे नवीन नाव

अध्यात्मिक दीक्षेनंतर ममता यांनी नवीन नाव धारण केले आहे. ममता कुलकर्णी यापुढे यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखली जाईल.

Mamta Kulkarni | google

किन्नर आखाड्याची उपाधी

अभिनेत्री ममता यांना किन्नर आखाड्यातील संतांच्या उपस्थितीत पंचामृताने पट्टाभिषेकनंतर महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली.

Mamta Kulkarni | google

पिंड दान

त्यांनी स्वतःच्या हातांनी प्रयागराजमधील संगम काठावर पिंड दान केले.

Mamta Kulkarni | google

बॅालिवूड ते अध्यात्मिक प्रवास

ममता कुलकर्णी यांनी 1991 मध्ये 'नानबर्गल' या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ३४ चित्रपटांमध्ये काम केले.

Mamta Kulkarni | google

बॅालिवूड करिअर

छुपा रुस्तम, चायना गेट, करण अर्जुन, नसीब आणि तिरंगा यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत ममता कुलकर्णीची बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

Mamta Kulkarni | google

सार्वजनिक जीवनाचा त्याग

धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारण्यासाठी अभिनेत्रींने ग्लॅमरस जगापासून दूर जाणे पसंत केले.

Mamta Kulkarni | google

ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी

ममता यांनी त्यांच्या 'ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी' या पुस्तकात लिहिले आहे की, तिने देवाला तिचे पहिले प्रेम म्हणून स्वीकारले आहे.

Mamta Kulkarni | google

NEXT: संध्याकाळी झाडाची फुलं आणि पानं का तोडू नये? कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

Plants | freepik
येथे क्लिक करा