ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सुंदर दिसायचे असेल, तर तयार होताना या गोष्टी लक्षात ठेवा.
तुम्हाला ही परफेक्ट आऊटफिट हवा असेल तर केशरी, पांढरा आणि हिरवा हे तिन्ही रंग तुमच्या आऊटफिट मध्ये वापरा. पूर्ण आऊटफिटमध्ये सगळे रंग वापरण्यापेक्षा कोणतातरी एकच रंग वापरा. असे केल्यास तुमचा लुक भडक न वाटता छान आणि सोबर दिसेल.
जास्त मेकअप करणे टाळावे. हलका फाउंडेशन, सॉफ्ट ब्लश, न्यूड किंवा फिकट गुलाबी लिपस्टिक आणि मस्करा तुम्हाला एक फ्रेश आणि सुंदर लुक देईल.
तिरंग्याचे रंग तुम्ही तुमच्या आयलाइनर किंवा नेल आर्टमध्ये नाजूकपणे समाविष्ट करू शकता.
मोकळे केस, लो बन, हाय पोनीटेल किंवा साधी वेणी यांसारख्या हेअरस्टाईल्स सर्वात चांगल्या दिसतात. लूक साधा सिंपल ठेवायचा असेल तर स्टाइलिंग करणे टाळावे.
जड दागिन्यांऐवजी, लहान कानातले, स्टड्स, ब्रेसलेट किंवा तिरंगी बॅजेस आणि केसांच्या ॲक्सेसरीज निवडा. यामुळे तुमचा लूक मेन्टेन राहील आणि तुमचे कपडे उठून दिसतील.
फ्लॅट्स, जुत्ती, स्नीकर्स किंवा कमी उंचीच्या हिल्सचे चप्पल हे बेस्ट पर्याय आहेत. अशा चप्पल तुमच्या आऊटफिटवर ही मॅचिंग होतील.
जानेवारीमध्ये थंडी असते, म्हणून हलके स्वेटर, जॅकेट किंवा शॉल सोबत घ्या. अशा प्रकारे कपडे घाला की गरजेनुसार तुम्ही सहजपणे कपडे घालू किंवा काढू शकाल.