ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुरळ्या केसांची देखरेख नॉर्मल केसांपेक्षा जास्त करावी लागते. कुरळे केस लगेच फ्रिजी आणि विस्कटलेले वाटू लागतात.
केसांना सॉफ्ट करण्याच्या चक्करमध्ये काही वेळा लोक घरगुती उपाय करतात. पण त्याने फायदा नाही तर नुकसान होते.
काही अश्या गोष्टी आहेत ज्या कुरळ्या केसांवर लावू नये. लावल्यास तुमची केसं डॅमेज आणि ड्राय होऊ शकतात.
केसांवर डायरेक्ट कधीच बेकिंग सोडा लावू नये. याने केस फ्रिजी होतील आणि स्कॅल्प ड्राय होऊ लागेल.
ओल्या केसांवर हिटिंग टुल्सचा वापर कधीच करु नये. ओल्या केसांवर गरम हिट लागल्यास केस तुटण्यास सुरु होतात.
घाई गडबडीत कुरळ्या केसांना कधीच साबणाने धुवू नये. साबणाने केसं धुतल्यास केस चिपचिपी होतील.
जर एखाद्या शॅम्पूमध्ये सल्फेट्सचे प्रमाण जास्त असेल, तर तो वापरू नका. त्यामुळे कुरळे केस पातळ होतात, ज्यामुळे केस गळती होऊ शकते.
केसांना लवकर सुकवण्याच्या घाईत ब्लो ड्रायरचा वापर करु नये. केस सुकले जातील पण सुकल्यानंतर केस खूप बाउंसी दिसतील.
कुरळ्या केसांच्या देखभालीसाठी नारळ तेल आणि बदामाचे तेल लावाले. या तेलांमुळे केस सॉफ्ट आणि शाईनी दिसू लागतील
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.