Dhanshri Shintre
रेनोने युरोपबाहेरील ग्राहकांसाठी खास नवीन 7 सीटर SUV ‘बोरियल’ लॉन्च करून आपली बाजारपेठ विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे.
रेनो बोरियल SUVद्वारे वाढती मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये कंपनी आपल्या उपस्थितीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे.
रेनोच्या जागतिक योजनेचा बोरियल महत्त्वाचा भाग असून कंपनी 2027 पर्यंत 8 नवीन गाड्या आणण्यासाठी 3 अब्ज युरो गुंतवणार आहे.
लवकरच रेनो बोरियलसह कार्डियन आणि कोलिओस सारख्या नवीन मॉडेल्ससह बाजारात आपली उपस्थिती वाढवणार आहे.
रेनो बोरियलची लांबी 4.56 मीटर असून 2.7 मीटरचा व्हीलबेस आणि प्रशस्त केबिनसह भरपूर बूट स्पेस मिळणार आहे.
रेनो बोरियलमध्ये नायग्रा कॉन्सेप्टवर आधारित आधुनिक फ्रंट लाइटिंग आणि नवीन फ्रंट-रिअर डिझाइन लँग्वेजचा समावेश करण्यात आला आहे.
बोरियल SUV मध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, पॅनोरॅमिक सनरूफ, रूफ बार आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेट्सची सुविधा आहे.
रेनो बोरियल SUV मध्ये लेन कीपिंग, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, अॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि हँड्स फ्री पार्किंगसह स्मार्ट सुरक्षा फीचर्स मिळतील.
रेनो बोरियलचे 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन फ्लेक्स-फ्यूलमध्ये 162 बीएचपी, तर पेट्रोल व्हर्जनमध्ये 136 बीएचपी निर्माण करते.