Manasvi Choudhary
प्रत्येकाच्या घरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू या सहज पाहायला मिळतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? प्लास्टिकच्या वस्तूंचा आरोग्यावर परिणाम होतो.
घरामध्ये स्वयंपाकघरात अनेक वस्तू प्लास्टिकच्या असतात ज्यामुळे केवळ आरोग्यालाच नाही तर पर्यावरणालाही धोका होतो. यामुळेच कोणत्या प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत हे जाणून घ्या.
स्वयंपाकघरात आपण चॉपिंग बोर्ड वापरतो. या प्लास्टिकच्या बोर्डवर आपण भाजी कापतो यातील प्लास्टिकचे छोटे कण शरीरात प्रवेश करतात यामुळे तो वापरताना काळजी घ्या.
प्लास्टिकच्या टिफिनचा वापर आपण करतो प्लास्टिकच्या टिफिनमध्ये ठेवलेले गरम अन्न आरोग्यासाठी हानिकारक असते.
पाणी पिण्यासाठी आपण प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतो प्लास्टिकची बॉटल वापरणे आरोग्यासाठी घातक आहे.
बाजारातून सामान आणण्यासाठी आपण प्लास्टिकची पिशवीचा वापर करतो मात्र हे करू नये त्याऐवजी आपण कापडाच्या पिशवीचा वापर करू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.