Bharat Jadhav
जिओचे सात इंटरनॅशनल रिचार्ज प्लान
Reliance Jio ने 21 देशांसाठी 7 नवीन आंतरराष्ट्रीय रिचार्ज योजना लॉन्च केले आहेत.
काय आहे दर
कंपनीने इंटरनॅशनल सबस्क्राइबर डायलिंग (ISD) प्लान आणलेत. या प्लॅनमध्ये, सर्वात स्वस्त रिचार्ज 39 रुपयांचा आहे आणि सर्वात महाग 99 रुपयांचा इंटरनॅशनल सब्सक्राइबर डायलिंग प्लॅन आहे.
३९ रुपयांचा प्लान
जिओचा ३९ रुपयांचा प्लान अमेरिका आणि कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय कॉलिंग सुविधेसह येतो. हे ३० मिनिटांचा कॉलिंगचा वेळ देतो.
४९ रुपयांचा प्लान
जिओचा ४९ रुपयांचा प्लान २० मिनिटांच्या कॉलिंग टाइमसह येतो. हा प्लॅन बांगलादेशमध्ये कॉलिंगसाठी उपलब्ध आहे.
५९ रुपयांचा प्लान
जिओचा ५९ रुपयांचा प्लान चार देशांसाठी उपलब्ध आहे. या प्लानमधून तुम्ही थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कॉल करू शकता.
जिओचा ७९ रुपयांचा प्लान
चार देशांसाठी हा प्लान लॉन्च करण्यात आलाय. हा आंतरराष्ट्रीय प्लान फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि यूकेसाठी उपलब्ध आहे.
८९ रुपयांचा प्लान
Jio चा ८९ रुपयांचा प्लान जपान, चीन आणि भूतानसाठी लॉन्च करण्यात आलाय. यामध्ये १५ मिनिटांचा कॉलिंग टाईम यात मिळतो.
Jio चा ९९ रुपयांचा प्लान
5 देशांसाठी उपलब्ध आहे. हा प्लान सौदी अरेबिया, UAE, कुवैत, बहरीन आणि तुर्कियासाठी हा प्लान आणलाय.
येथे क्लिक करा