Surabhi Jayashree Jagdish
दिवस कार्यक्षम राहणार आहे. आज तुम्हाला गुंतवणूक फायद्याची ठरेल.
मनाजोग्या गोष्टी करायला तुम्हाला आवडू शकतं. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळणार आहे. काळजी नसावी.
विष्णू उपासना करावी. त्याचे छान फळ मिळू शकणार आहे. तीर्थक्षेत्री भेट देण्याचा मानस असेल तर या गोष्टी पूर्ण होतील.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज एकटे पडल्याची जाणीव होईल.
विनाकारण कोणी आपल्याशी भांडण केलं तर त्याच्याशी दोन हात करावे लागतील. कोर्ट कचेरी, वादविवाद यामध्ये यश मिळेल.
हाताखालील लोकांपासून धोका आहे. सावधगिरीचा इशारा आहे.
मनाजोगी कामे घडणार आहे. कामांना वेग येणार आहे. सृजनशीलता वाढू शकते.
घर खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण होतील. घरी पाहुण्यांचे आगमन होईल.
प्रेमात लाभ होतील. जवळचे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
पैशाची आवक चांगली राहिल्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे. देवधर्म, अध्यात्मात मन लागेल.
आपले व्यक्तिमत्त्व बहरून येईल. स्वतःच्या खरेदीसाठी दिवस व्यस्त राहील.
जोडलेली नाती धोकादायक ठरतील. विनाकारण म्हणूनच मनस्तापाचा आजचा दिवस आहे.