Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Saam Tv

मला या नात्याचा पश्चाताप होतोय

रागाच्या भरात किंवा भांडणाच्या वेळी कधीही असे म्हणू नका की तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत राहिल्याचा किंवा लग्न केल्याचा पश्चाताप होतोय.

relationship anger | pinterest

त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल टोमणे मारणे

भांडण झाले तरी जोडीदाराच्या आर्थिक पार्श्वभूमीवर किंवा स्थितीवर टीका करू नका. प्रत्येकाची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते.

relationship anger | pinterest

जोडीदाराच्या कुटुंब किंवा मित्रांचा अपमान करणे

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा स्वभाव आवडत नसेल, तरीही त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल अपमानास्पद बोलणे टाळा.

relationship anger | pinterest

जोडीदाराच्या कमकुवतपणाची किंवा असुरक्षिततेची खिल्ली उडवणे

कधीकधी जोडीदाराच्या दिसण्यावरून, सवयींवर किंवा त्यांच्या एखाद्या असुरक्षिततेवर थट्टा केली जाते. हे जरी क्षुल्लक वाटत असले, तरी ते त्यांच्या मनाला खूप लागते.

relationship anger | pinterest

माझं तुझ्यावर असलेलं प्रेम किंवा आपण एकत्र राहणं ही माझी सर्वात मोठी चूक होती

रागाच्या भरात जेव्हा आपण नात्याच्या मूळावरच घाव घालतो, तेव्हा पार्टनरला असे वाटते की आपल्या संपूर्ण प्रवासाला आणि प्रेमाला काहीच किंमत नाही.

relationship anger | pinterest

तुला कधीच काही कळत नाही

या वाक्यामुळे पार्टनरला समजून घेण्याऐवजी त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच नाकारल्यासारखे वाटते. 'नेहमी' किंवा 'कधीच नाही' असे शब्द वापरल्याने समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास खचतो आणि संवाद पूर्णपणे बंद होतो.

relationship anger | pinterest

तुझ्यामुळेच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय

आपल्या आनंदाची किंवा दुःखाची संपूर्ण जबाबदारी जोडीदारावर ढकलणे अत्यंत चुकीचे आहे. हे वाक्य पार्टनरला अपराधी भावनेने भरून टाकते आणि नात्यात एक कायमची दरी निर्माण करते.

relationship anger | pinterest

तुझ्या कुटुंबाची किंवा आई-वडिलांची सवयच अशी आहे

रागाच्या वेळी जोडीदाराच्या कुटुंबाला किंवा वैयक्तिक पार्श्वभूमीला मध्ये आणणे अत्यंत वेदनादायी ठरते.

relationship anger | pinterest

NEXT : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

Kitchen Hacks | AI PHOTO
येथे क्लिक करा