Bharat Jadhav
ब्रेकअपचे दुःख सर्वांनाच सहन होत नाही. काही लोक पूर्णपणे नैराश्यात जातात. ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना आयुष्य अपूर्ण वाटू लागतं.
ब्रेकअपनंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे. तसे केले नाही तर त्रास अधिक होऊ शकतो.
ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या कारणांचा विचार करू नका. कारण काय होते याचा विचार करण्याऐवजी तुमचे मन दुसरीकडे गुंतवा.
ब्रेकअपनंतर मैत्रीण किंवा प्रियकर पुन्हा संपर्कात राहतील अपेक्षा करू नका. बहुतेकांना वाटतं की, त्यांची प्रेयसी किंवा प्रियकर परत येईल. पण खोटं वास्तव असते.
ब्रेकअपनंतर तुम्ही त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट चेक करत असाल. तर तसे करू नका. नाहीतर अजून जास्त त्रास होईल.
ब्रेकअप झाल्यानंतर समोरील व्यक्तीला परत परत कॉल करुन प्रेमाची भीक मागू नका. बरेचजण ही चूक करतात.
जेव्हा समोरील व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, तर तुम्ही हे मान्य केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या आयुष्यात नाहीत हे मान्य करा.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण त्याचं प्रेम कसं खरं आहे, हे सांगतात. नेहमी प्रेमासाठी लोटागंण घालतात. पण समोरील व्यक्ती तुमची मस्करी करत असते.
ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर कधीही दुःखी पोस्ट शेअर करू नका. काही दिवसानंतर दु: ख कमी होईल.
येथे क्लिक करा