Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Shruti Vilas Kadam

बोलणं टाळतो

लग्न, करिअर किंवा एकत्र भविष्याबाबत बोलणे तो सतत टाळत असेल, तर तो नात्याबाबत गंभीर नसण्याची शक्यता असते.

Relationship Tips

गरज असेल तेव्हाच संपर्क करतो

फक्त स्वतःच्या सोयीप्रमाणे फोन किंवा मेसेज करणे आणि बाकी वेळ दुर्लक्ष करणे, हे नात्यातील प्रामाणिकपणाचा अभावामुळे असू शकते.

Relationship Tips

तुमची ओळख मित्र किंवा कुटुंबाशी करून देत नाही

खूप काळ नात्यात असूनही तो तुम्हाला त्याच्या जवळच्या लोकांशी भेटवत नसेल, तर त्यामागे काहीतरी कारण असू शकते.

Relationship Tips

भावना व्यक्त करण्यास टाळाटाळ करतो

प्रेम, विश्वास किंवा नात्याविषयी स्पष्ट बोलण्याऐवजी तो विषय बदलत असेल, तर त्याच्या मनात संभ्रम असू शकतो.

Relationship Tips

वचन देतो पण ते पाळत नाही

वारंवार आश्वासने देऊनही ती पूर्ण करत नसेल, तर त्याच्या शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे ठरते.

Relationship Tips

नात्यात प्रयत्न फक्त तुमच्याकडूनच होतात

भेटी, संवाद किंवा नाते टिकवण्यासाठी प्रयत्न नेहमी तुम्हालाच करावे लागत असतील, तर हे एकतर्फी नाते असल्याचे संकेत असू शकतात.

Relationship Tips | pexel

तुमच्या भावना आणि तुम्हाला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो

तुमच्या आनंद-दुःखाची किंवा अडचणींची त्याला फारशी काळजी वाटत नसेल, तर तो नात्यात भावनिक गुंतलेला नसण्याची शक्यता असते.

Relationship Tips | Yandex

Acidity Home Remedy: सतत अॅसिडिटीचा त्रास होतोय? मग हे 7 घरगुती उपाय केल्याने पोटाला मिळेल आराम

Acidity Home Remedy | AI
येथे क्लिक करा