Bharat Jadhav
स्त्री जेव्हा नऊ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या शरीरात आणि मनात प्रचंड बदल होतात.
बाळंतपणानंतर महिलांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि हार्मोनल बदल जाणवत असतात.
या बदलांमुळे महिलांना बहुतेकवेळा प्रसूतीनंतरच्या नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.
हा काळ नवीन आईसाठी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असतो. या काळात जोडीदाराने तिला आधार देण्याची गरज असते.
कामावरून पत्नीला टोमणा मारू नये, त्यामुळे त्यांना अजून अपमानित आणि असहाय्य वाटू शकते.
गर्भधारणेदरम्यान महिलांना कधी आनंद, कधी दुःख तर कधी तिला एकटेपणा वाटत असतो.
आईच्या शरीरात बदल होतात आणि हे बदल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या असतात.