कोमल दामुद्रे
नात्यात बरेचदा अशी वेळ येते ज्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की, जोडीदार आपल्यावर प्रेम करत नाही.
जर तुमच्या नात्यातही या ५ गोष्टी होत असतील तर वेळीच काळजी घ्यायला हवी
जोडीदाराशी वैचारिक मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे पण असे वारंवार होत असेल तर संवाद साधणे गरजेचे आहे.
आपल्या जोडीदाराशी नेहमी भविष्याबद्दल चर्चा करा, असे होत नसेल तर नात्यात दूरावा येतो.
जर तुमचा पार्टनर तुम्हाला सतत दुर्लक्ष करत असेल तर तुमच्या नात्यातील भावनिक जवळीकता संपली आहे असे समजा.
जर तुमचा पार्टनर तुम्हाला सतत भेटण्याचे टाळत असेल तर त्याचे कारण जाणून घ्या
जर तुमचा जोडीदार तुम्हाला छोट्या छोट्या चुका सांगू लागला तर तुम्हाला तो कंटाळला असे समजा.
तुम्ही किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला सतत भेटण्यास नकार देत असेल किंवा प्रेमाने बोलत नसेल तर तुमच्या नात्यात दूरावा आलाय हे समजून घ्या.