कोमल दामुद्रे
पाणी प्यायल्याने अनेक आजार बरे होतात. मात्र जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
जर तुम्हाला शरीर निरोगी ठेवायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे. यामुळे दिवसभर तुमचे शरीर हायड्रेट राहाते.
भरपूर पाणी प्यायल्यान लठ्ठपणा कमी होतो. तसेच त्वचा चमकदार आणि डागविरहित होते.
जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने तुम्हाला लठ्ठपणाची समस्या होऊ शकते.
जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
जेवताना पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे आंबट ढेकरचा त्रास होतो.
आपल्या पचनसंस्थेचे काम अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेते. त्यासाठी जेवताना पाणी पिऊ नका.