Bharat Jadhav
लग्न करण हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. लग्नाआधी कोणी मुलगी किंवा मुलगा भेटण्यास की काहीसा संकोच होणार हे उघड आहे.
लग्नाआधी दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन कळला तर पुढचा मार्गसोपा होत असतो.
तुमचा जोडीदारचं लग्नाविषयी काय मत आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. लग्नाविषयी त्याची काय भावना आहे हे जाणून घ्यावे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला भविष्यातील उद्दिष्टे आणि प्लॅनिंगबद्दल जाणून घ्या.
जोडीदाराला विचारलं पाहिजे की, लग्नाकडून काय अपेक्षा आहेत. यामुळे तुम्हाला त्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल.
काहींना संयुक्त कुटुंबात राहणे सोयीचे वाटते तर काहींना वेगळं राहायचं असते. त्यामुळे ही गोष्टीची चर्चा करा.
तुमच्या जोडीदाराची लाईफस्टाईल, छंद इत्यादींबद्दल जाणून घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या.
प्रत्येकाचे काहींना काही छंद असतात. तसेच इतर सवीय आणि छंद जाणून घ्या.
येथे क्लिक करा