HBD Rekha : रॉयल लूक, कारचे भन्नाट कलेक्शन; रेखा किती कोटींच्या मालकीण?

Shreya Maskar

रेखा वाढदिवस

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आणि लाखों दिलों की धडकन रेखा यांचा आज (10 ऑक्टोबर 1954) वाढदिवस आहे. त्या आज 71 वर्षांच्या झाल्या आहेत.

Rekha | yandex

जन्म कुठे झाला?

रेखा यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. रेखा या अभिनयासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

Rekha | yandex

बॉलिवूड पदार्पण

रेखा यांनी 1970 मध्ये रिलीज झालेल्या सावन भादों (Sawan Bhadon) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Rekha | yandex

गाजलेले चित्रपट

रेखा यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांचे उमराव जान, सिलसिला, घर, खून भरी मांग, इजाजत, दो अंजाने, मुकद्दर का सिकंदर, क्रिश, खूबसूरत आणि झुबेदा हे चित्रपट गाजले आहेत.

Rekha | yandex

मानधन किती?

रेखा या एका चित्रपटासाठी जवळपास 8 ते 13 कोटींच्या आसपास मानधन घेतात. तर एका जाहिरातीसाठी 5-7 कोटी फी घेतात.

Rekha | yandex

आलिशान घर

रेखा यांचा मुंबईत वांद्रे येथे 'बसेरा' नावाचा सी फेसिंग बंगला आहे. ज्याची किंमत अंदाजे 100 कोटी आहे. तसेच त्यांची चेन्नईमध्येही मालमत्ता आहे.

Rekha | yandex

कार कलेक्शन

रेखा यांच्याकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. ज्यात रोल्स-रॉयस, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू यांचा समावेश आहे. या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

Rekha | yandex

नेटवर्थ किती?

रेखा या लग्जरी आयुष्य जगत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास 332 कोटी रुपयांच्या वर आहे.

Rekha | yandex

NEXT : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Sshura Khan | instagram
येथे क्लिक करा...