ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरातले लाखो नागरिक त्यांच्या आहारात मीठाचा अधिक समावेश करत आहे.
जेवणातील चिमुटभर मीठ आपल्या पदार्थांची चव वाढवतो. त्याचबरोबर थोडे जास्त मीठ पदार्थाची चव खराब करत असतो.
आहारात मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकार,उच्च रक्तदाब, किडनी आणि कॅन्सर यांसारख्या आजाराचा धोका निर्माण होतो.
दररोज निरोगी राहण्यासाठी नागरिकानीं आहारात पाच ग्रॅम मीठाचे सेवन करायला हवे.
रोजच्या पदार्थामध्ये मीठाचे अधिक प्रमाण असल्याने देशभरात दरवर्षी १८.९ लाख मृत्यू होत आहे.
बाहेरच्या फास्ट फुडमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात मीठ असते.त्यामुळे चिप्स,नाचोज, केचअप,सॅास,पॅकेज्ड फूड सारखे पदार्थ चुकुनही खावू नका.
निरोगी शरीरासाठी आहारात सॅलड खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. सॅलडमधील काकडी,टोमॅटो,गाजर यांसारख्या हंगामी फळांमध्ये पुरेसे मीठ असते.
जेवणात पालक,कोबी,फ्लॅावर,कांदा,टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.