Manasvi Choudhary
आज रोज डे निमित्त तुम्ही पार्टनरसाठी गुलाबाचे सरबत बनवू शकता. सरबत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
बाजारातील सिरप किंवा ताज्या गुलाबाच्या पाकळ्यापासून तुम्ही घरच्या घरी गुलाब सरबत बनवू शकता.
गुलाब सरबत बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या, साखर, लिंबाचा रस, बीट, बेलची पावडर हे साहित्य एकत्र घ्या.
गुलाबाच्या पाकळ्या निवडून त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. गॅसवर एका पातेल्यात गरम पाणी करा त्यात गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करा.
गुलाबाचे पाणी चांगले उकळून द्या त्यात तुम्हाला रंग डार्क हवा असल्यास तुम्ही बीट देखील मिक्स करू शकता.
आता हे पाणी गाळणीने एका ग्लासामध्ये गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि वेलची पावडर मिक्स करा.
गुलाब सिरप तयार झाल्यानंतर ते तुम्ही एका बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. नंतर गुलाबाचे सरबत बनवण्यासाठी गुलाब सिरप, मीठ आणि बर्फ एकत्र घ्या.