Manasvi Choudhary
चमकदार त्वचेसाठी केवळ महागड्या क्रिमच नाही तर तुम्ही घरगुती सोपा उपायांनी त्वचेचा पोत सुधरवू शकता.
गूळाचा वापर आपण पदार्थांसाठी करतो मात्र तुम्हाला माहितीये का? चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुळाचा प्रभावी उपाय आहे.
गूळ त्वचेचं टॅनिंग कमी करून नैसर्गिकरित्या त्वचा उजळ करण्यास मदत करते.
आयुर्वेदिक उपाय म्हणून तुम्ही गुळाचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावू शकता.
गुळाची पावडर किंवा गुळाचे बारीक तुकडे करून त्यात लिंबाचा रस मिक्स करून ही पेस्ट तयार करा.
गुळाचा फेस पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुवा. त्यानंतर गुळाचा फेसपॅक लावा.
साधारण आठवडाभर नियमितपणे गुळाचा फेसपॅक लावल्यास सात दिवसांत चेहरा उजळण्यास मदत होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.