Manasvi Choudhary
पदार्थांची चव वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर केला जातो. कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी कांदा खाल्ला जातो.
बाजारात दोन प्रकारचे कांदे आहे. एक म्हणजे लाल कांदा आणि दुसरा पांढरा कांदा.
स्वयंपाकघरात पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांद्याचा वापर अधिक केला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का? कांद्यामध्ये अँटीऑक्सिड्टस, सल्फर आणि मिनरल्स ही पोषणतत्वे असतात.
मात्र लाल आणि पांढऱ्या कांद्यामध्ये वेगवेगळे गणधर्म असतात. पांढऱ्या कांदापेक्षा लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिड्टंस गुणधर्म अधिक असतात.
लाल कांद्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या होत नाहीत. ब्रेस्ट, प्रोस्टेट कॅन्सरच्या रूग्णांनी कांद्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
तर पांढरा कांद्यामध्ये लाल कांद्याचा तुलनेत अधिक एंटीबायोटिक आणि एंटी- इप्लेमेटरी गुण असतात.
लाल कांदा तसेच पांढरा कांदा दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी असते. अशामुळे लाल आणि पांढरा दोन्ही कांद्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पांढरा कांदा चवीला थोडा गोड असतो तर लाल कांदा हा तिखट असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.