Manasvi Choudhary
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्यात बाजारात माठ खरेदीला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते.
बाजारात काळा आणि लाल रंगाचे मातीचे माठ विकायला असतात. मात्र खरेदी करताना नेमका कोणत्या रंगाचा माठ घ्यावा असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या रंगाच्या माठामध्ये पाणी थंड राहील.
उन्हाळ्यात थंड पाणी प्यावेसे वाटते. फ्रिजमधील थंड पाणा आरोग्यासाठी घातक ठरू शकते यामुळे माठ खरेदी केले जातात.
लाल माठ हे भाजलेल्या मातीपासून बनवले जाते तर काळा माठ हा काळ्या दगडापासून बनवले जाते.
लाल माठाच्या तुलनेत काळ्या माठातील पाणी लवकर थंड होते म्हणून उन्हाळ्यात काळा माठ खरेदी करणे फायदेशीर राहील.
मात्र माठ विकत घेताना हातात घेऊन तपासले पाहिजे अनेकदा काळा माठ बनवण्यासाठी सिमेंटचा वापर केला जातो.