Shruti Vilas Kadam
रेड व्हेल्वेट कपकेकसाठी लागणारे मुख्य घटक – मैदा, साखर, कोको पावडर, अंडी, दूध, व्हिनेगर, बटर, लाल रंग आणि व्हॅनिला इसेन्स.
कपकेक बेक करण्यासाठी ओव्हन 180°C (डिग्री सेल्सियस) वर प्री-हीट करून ठेवा.
एका भांड्यात सुकं साहित्य (मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर) आणि दुसऱ्या भांड्यात बटर, साखर, अंडी, दूध, व्हिनेगर आणि व्हॅनिला इसेन्स चांगलं मिसळा.
सुकं व ओलं मिश्रण एकत्र करून त्यात लाल फूड कलरिंग घालून मिक्स करा, जेणेकरून सुंदर लाल रंग येईल.
तयार मिश्रण कपकेक मोल्डमध्ये ¾ भागभर भरा, कारण बेक करताना ते फुगतात.
कपकेक 15–20 मिनिटे बेक करा. नंतर पूर्णपणे थंड होईपर्यंत बाहेर काढून ठेवा.
थंड झाल्यानंतर कपकेकवर क्रीम चीज फ्रॉस्टिंग लावून हव्यासारखी सजावट करा आणि सर्व्ह करा.