Shruti Vilas Kadam
रेड वेलवेट केकसाठी मैदा, कोको पावडर, साखर, बटर, दूध, अंडी, व्हॅनिला इसेन्स, रेड फूड कलर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्या.
एका भांड्यात बटर आणि साखर चांगली फेटून घ्या. त्यात अंडी आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करा.
दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. हे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात घाला.
बॅटरमध्ये आवश्यकतेनुसार रेड फूड कलर आणि दूध घाला. बॅटर खूप घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घेत हलक्या हाताने मिक्स करा.
केक टिनला बटर लावून त्यात बॅटर ओता. आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये साधारण १७०-१८० अंश सेल्सिअस तापमानावर केक बेक करा.
केक पूर्ण थंड झाल्यानंतर क्रीम चीज, बटर आणि आयसिंग शुगर एकत्र फेटून क्रीमी फ्रॉस्टिंग तयार करा. केकच्या थरांवर आणि बाहेरील बाजूला फ्रॉस्टिंग लावा.
केकवर रेड वेलवेटचे छोटे क्रम्ब्स किंवा आपल्या आवडीप्रमाणे सजावट करा. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून कापून सर्व्ह करा.