Manasvi Choudhary
लाल साडीच्या अनेक डिझाईन्स आहेत. ट्रेडिशनल ते मॉडर्न स्टाईलमधील डिझाईन्स तुम्ही देखील निवडू शकता.
हिंदू धर्मात लाल साडी ही लग्नसोहळ्यासाठी नेसली जाते. लाल रंग हा प्रेमाचा प्रतिक आहे.
लाल साडीतील अनेक डिझाईन्स आहेत तुम्ही देखील लाल साडीतील हे पॅटर्न नक्की ट्राय करा.
प्लेन लाल सॅटिन साडीवर तुम्ही खास कमरेला बेल्ट असा लूक करू शकता प्रोफेशनल स्टाईलसाठी हा पॅटर्न परफेक्ट आहे.
आजकाल रफल साडी ट्रेंडमध्ये आहे. साडीच्या खाली म्हणजेच पदराला फ्रिल्स किंवा चुण्या असतात. हा एक फॅन्सी साडी पॅटर्न आहे.
लाल रंगाची वेलवेट साडी तुम्ही निवडू शकता. या साडीवर तुम्ही खास ब्लॅक कलरचा वेलवेट ब्लाऊज परिधान करा यामुळे तुमचा लूक एलिगंट दिसेल.
लाल रंगाच्या जॉर्जेट साडीवर तुम्ही खास गोल्डन वर्क देखील करू शकता. यामुळे साडीचा लूक उठून दिसेल.