Manasvi Choudhary
आजकाल महिलांमध्ये लांब मंगळसूत्राची क्रेझ आहे. पारंपारिक सौंदर्यावर साजेसं लांब मंगळसूत्र महिला पंसत करतात.
लग्नसराई आणि सणासुदीला तुम्ही खास साडीवर हे लांब मंगळसूत्र निवडू शकता. लांब मंगळसूत्राचे हटके पॅटर्न आहेत.
रंगीत स्टोन लावलेले लाँग मंगळसूत्र पार्टीवेअर आणि फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट असते.
कोरीव पेंडंट असलेले लाँग मंगळसूत्र पारंपरिक लूक देणारे असते. सण-समारंभ आणि लग्नकार्यांसाठी हे डिझाइन खास निवडले जाते.
कोल्हापुरी स्टाईल मंगळसूत्रामध्ये पाने, फुले या डिझाईन्स आहेत. या माळेत माळेत साजाची पानं, जवमणी आणि पदकांचा वापर केलेला असतो.
काळ्या मण्यांच्या ३ ते ४ पदरी माळा आणि शेवटी मोठा पेन्डंट तुम्ही निवडू शकता.
पेन्डंटवर देवी लक्ष्मीची मूर्ती आणि बाजूला मोराची नक्षी हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. साऊथ सिल्क साड्यांवर हा पॅटर्न सुंदर दिसतो.
काळ्या मण्यांची लांब माळ आणि खाली हिऱ्यांचे किंवा खड्यांचे फुलांच्या आकाराचे पेन्डंट हे देखील तुम्ही मंगळसूत्रामध्ये निवडू शकता.