Manasvi Choudhary
मुंबईसह संपूर्ण राज्यात पावासाने हाहाकार केला आहे. सध्या पावसामुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीची मोठी शक्यता असते. अशा वेळी प्रशासनाकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जाते. रेड अलर्ट दरम्यान कोणत्या ठिकाणी जाणे टाळावे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
रेड अलर्ट दरम्यान कोणत्या ठिकाणी जाणे टाळावे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
रेड अलर्ट दरम्यान दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्ही लोणावळा, खंडाळा, माथेरान यांसारख्या घाटातील प्रवास आणि पर्यटना ठिकाणी जाऊ नका.
धबधब्यांच्या ठिकाणी किंवा नदीच्या किनारा अशा ठिकाणी जाऊ नका, पाऊस अचानक वाढल्यास पाण्याचा प्रवाह वाढून पुरात अडकाल.
समुद्राच्या लाटा आणि अतिवृष्टीमुळे किनारपट्टीचा परिसर पाण्याने व्यापतो. त्यामुळे बीचवर जाणे टाळा .
पाणी साचणाऱ्या आजबाजूच्या ठिकाणी जाणे टाळा. अनेकदा साचलेल्या पाण्याखाली उघडी गटारे किंवा मॅनहोल असू शकतात, जे जीवघेणे ठरू शकतात. .
पावसामुळे जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, अशा परिसरापासून लांब राहा