रानात मिळणारी टाकळ्याची भाजी पावसाळ्यात आवर्जून खा, चवीसाठी आणि आरोग्यासाठीही एकदम भारी

Manasvi Choudhary

टाकळा भाजी

पावसाळ्यात रानावनात, शेतात मिळणारी टाकळा भाजी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Takla Bhaji

पौष्टिक घटक

टाकळा या भाजीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, झिंक, मॅगेनीज, पोटॅशियम ही पौष्टिक घटके असतात.

Takla Bhaji

आरोग्यासाठी फायदेशीर

पावसाळ्यात टाकळ्याची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. सर्दी, खोकला या आजारांवर प्रभावी उपाय आहे.

Takla Bhaji

सोपी रेसिपी

टाकळा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.

Takla Vegetable | Saam Tv

साहित्य

टाकळा भाजी बनवण्यासाठी टाकळा, कांदा, हिरवी मिरची, लसूण, जीरे, तुरडाळ किंवा मुगडाळ, लाल मसाला, हळद, तेल, ओलं खोबरे हे साहित्य घ्या.

Takla Bhaji

भाजी बारीक कापून घ्या

भाजी बनवण्याआधी टाकळ्याच्या भाजीची कोवळी पाने पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या.

Takla | Saam Tv

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलात ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, भिजवलेली मुगडाळ, मसाला, हळद घालून परतून घ्या.

Fodni

भाजी वाफेवर शिजवा

नंतर या मिश्रणात चिरलेली भाजी टाकून मीठ टाका. झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवा.

takla | yandex

भाजीत ओलं खोबरं मिक्स करा

भाजी शिजल्यानंतर त्यात ओलं खोबरं मिक्स करा म्हणजे गरमागरम भाजी तयार होईल.

takla

NEXT:पावसाळ्यात खा गावरान शेवळा भाजी; चव अशी की बोटं चाटत राहाल!| Shevla Bhaji Recipe

Shevla Bhaji Recipe
येथे क्लिक करा...