लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत...! तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती तासांची झोप घ्यावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शांत झोप

आपल्या प्रत्येकाला शांत झोपेची गरज असते. मात्र वयोमानानुसार किती प्रमाणात झोप घ्यावी हे पाहूयात

तीन ते पाच वर्ष

मुलांसाठी झोप तीन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी १० ते १३ तासांची झोप आवश्यक मानली जाते जेणेकरून ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.

सहा ते तेरा वर्ष

शालेय मुलांसाठी झोप सहा ते तेरा वयोगटातील शालेय मुलांनी दररोज ९ ते ११ तासांची झोप घेतली पाहिजे.

चौदा ते सतरा वर्ष

किशोरांसाठी झोप चौदा ते सतरा वयोगटातील किशोरांनी दररोज ८ ते १० तास गाढ झोप घ्यावी लागणार आहे.

१८ ते २५ वर्ष

तरुणांसाठी झोप १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी दररोज ७ ते ९ तास झोपावं जेणेकरून त्यांची एकाग्रता चांगली राहिल आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही.

२६ ते ६४ वयोगट

प्रौढांसाठी झोप २६ ते ६४ वयोगटातील प्रौढांना दररोज किमान ७ ते ९ तास झोपण्याचा सल्ला दिला जातो.

वृद्ध व्यक्ती

वृद्धांसाठी झोप ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना देखील दररोज सुमारे ७ ते ८ तास झोप आवश्यक असते.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा