Nauvari Saree Draping : नऊवारी नेसण्याची झंझट विसरा; फक्त १ मिनिटांत साडी नेसून होईल, वापरा 'ही' भन्नाट ट्रिक

Shreya Maskar

नऊवारी साडी

तुम्हाला नऊवारी साडी नेसता येत नसेल किंवा साडी नेसायला जास्त वेळ लागत असेल तर एक भन्नाट उपाय म्हणजे रेडीमेड नऊवारी साडी खरेदी करा आणि फक्त १ मिनिटांत तुमची साडी नेसून होईल.

The Nauvari Saree | pinterest

कुठे खरेदी कराल?

रेडीमेड नऊवारी साडीला आजकाल बाजारात मोठी मागणी आहे. विविध रंगांच्या, स्टाइलच्या आणि डिझाइनच्या रेडीमेड नऊवारी साडी तुम्हाला कमी किंमतीत उपलब्ध आहेत. ५००-१००० पासून रेडीमेड नऊवारी साडी मिळते.

money | pinterest

नऊवारी साडी डिझाइन्स

लोकप्रिय डिझाइन्समध्ये सिल्क पैठणी, पेशवाई, ब्राह्मणी, कॉटन काष्टा यांचा समावेश आहे. ज्यात पारंपरिक धोती-शैलीतील चुण्या (काष्टा) आणि जरीची किनार असते.

Nauvari Saree Designs | pinterest

शिलाई

या साड्यांना आधीच शिवलेले पदर (काष्टा) आणि कंबरपट्टा असतो, ज्यामुळे पारंपरिक साडी नेसण्याच्या कौशल्याची गरज भासत नाही.

Stitching | pinterest

कापड कोणता?

अनेक साड्यांना पेटीकोट किंवा 'स्कर्ट' साडीलाच जोडलेला असतो. सामान्यतः मऊ रेशीम, सुती आणि जॉर्जेट यांसारख्या कापडांचा वापर केला जातो.

Choice of Fabric | pinterest

ब्लाउज

पफ स्लीव्हज, एल्बो लेंथ स्लीव्हज, थ्री-फोर्थ स्लीव्हज, व्ही-नेक ब्लाउज, बोट नेक असे सुंदर ब्लाउज खरेदी करा. हे ब्लाउज देखील तुम्हाला रेडीमेड उपलब्ध आहेत.

Blouses | pinterest

पेशवाई/शाही मस्तानी

उत्तम रेशीम, नाजूक जरीकाम असलेली पेशवाई नऊवारी साडी सणासुदीला खूपच सुंदर दिसते. यात एक राजेशाही लूक येतो.

Peshwai / Shahi Mastani | pinterest

पैठणी नऊवारी

मऊ रेशमी कापड, आकर्षक रंग, मोराची सुंदर नक्षी आणि भरजरी जरीची किनार, पदर असलेली साडीत तुम्ही खूपच सुंदर दिसता.

Paithani Nauvari | pinterest

NEXT : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

Ready To Wear Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...