Shraddha Thik
आवळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
आवळा खाल्याने पचनक्रिया चांगली राहते. याचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
आवळा खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने तुम्ही सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन टाळता येते.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकण्यास मदत करतात. याच्या सेवनाने कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
आवळा खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.