Sakshi Sunil Jadhav
एखाद्या सणावाराला घरामध्ये मस्त थाळी तयार केली जाते. त्यावेळेस ती कच्चा कांदा आणि लिंबाच्या फोडांनी पूर्ण होते किंवा आपल्याला दिसते.
अनेकांना जेवणासोबत कांदा, लिंबू, मिरची खाण्याची सवय असते. अर्थात याने जेवणाची चव वाढते, आणि हे पदार्थ पौष्टीक सुद्धा असतात.
सध्या उन्हाळा सुरु झालाय. मग यादिवसांमध्ये अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, कच्चा कांदा खाणं योग्य की अयोग्य? चला जाणून घेऊयात.
कांद्यामध्ये सोडीअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखी पोषक तत्व असतात.
तुम्ही जर उन्हाळ्यात जर कांदा खाल्लात तर तुम्हाला फायदाच होऊ शकतो. कारण त्यातले घटक तुमचं शरीर थंड करण्यास मदत करतात.
बऱ्याचदा लोक कमी पाणी पितात. अशावेळेस उन्हाळ्यात आपण जेवणासोबत कांद्याचं सेवन करु शकतो.
उन्हाळ्यात अनेकांना घामोळे येतात, एलर्जी होते, रॅशेज, खाज सुटते. या समस्यांवर कांदा खाणं हा सुद्धा एक उपाय आहे.
कांद्यामध्ये असणारे क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. तसेच ब्लड प्रेशर असणाऱ्यांनीही कांद्याचे सेवन करणं फायद्याचं ठरतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.