Shreya Maskar
कैरीचा चटपटीत भात बनवण्यासाठी कैरी, किसलेले खोबरे, कढीपत्ता, लाल मिरची, बासमती तांदूळ, नारळ तेल आणि मोहरी इत्यादी साहित्य लागते.
कैरीचा चटपटीत भात बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल मिरच्या आणि किसलेले खोबरे भाजून घ्या.
भाजलेल्या लाल मिरच्या, किसलेले खोबरे मिक्सरला वाटून घ्या.
जिरे, मेथी , कैरी आणि गुळची चांगली बारीक पेस्ट करून घ्या.
पॅनमध्ये मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, हळद, हिंग आणि कडीपत्ता गोल्डन फ्राय करून घ्या.
आता यात लाल मिरची आणि गुळाची पेस्ट टाकून छान मिक्स करा.
या मिश्रणाला तेल सुटू लागल्यावर यात शिजवलेला भात आणि चवीनुसार मीठ घाला.
शेवटी भातावर कोथिंबीर-पुदीना टाका.