Mango Pickle Recipe : १०-१५ मिनिटांत चटपटीत लोणचे तयार; वर्षभर टिकेल चांगले, न विसरता टाका 'हा' पदार्थ

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून आता बाजारात कैरी पाहायला मिळत आहे. नेहमी बाजारातील कैरीचे लोणचे खाण्यापेक्षा या सुट्टीत तुम्ही घरीच कैरीचे लोणचे सिंपल पद्धतीने बनवा. रेसिपी खूपच सोपी आहे.

Summer | pinterest

कैरीचे लोणचे

कैरीचे लोणचे बनवण्यासाठी कैरी, मेथी, मोहरी, मीठ, तेल, लाल तिखट, हळद, हिंग, बडीशेप इत्यादी साहित्य लागते.

Raw Mango Pickle | pinterest

कैरी

कैरीचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम आंबट कैरीची निवड करा. त्यानंतर कैरीच्या बारीक फोडी करा. यात लाल तिखट, मीठ, हळद घाला.

Raw Mangoes | pinterest

बडीशेप पावडर

त्यानंतर मिश्रणात बडीशेप पावडर टाकून चांगले मिक्स करा. कैरीला सर्व बाजूंनी मसाला लागू दे. जेणेकरून लोणच्याची चव आणखी वाढेल.

Fennel Seed Powder | pinterest

मोहरी

आता लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये मोहरी , बारीक मेथीचे दाणे परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला चांगले वाटा.

Mustard Seeds | pinterest

तेलाचा तडका

तयार चटपटीत मसाला कैरीच्या मिश्रणात टाका. त्यानंतर पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात लोणचे मिक्स करा. जेणेकरून लोणचे आणखी चवदार लागेल.

Oil | pinterest

स्टोर करा

आता तयार लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवा. लोणचे रात्रभर चांगले मुरेल. गरमागरम भात-भाकरी सोबत चटपटीत कैरीचे लोणच्याचा आस्वाद घ्या.

Storage | pinterest

टीप

कैरीचे लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी आणि बुरशी टाळण्यासाठी कैरी आणि भांडी पूर्णपणे कोरडी असणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Note | pinterest

NEXT : ॲसिडीटीमुळे हैराण झालात? रोज सकाळी प्या 'या' ३ पदार्थांपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक, पोट होईल साफ

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...