Shreya Maskar
कैरी-पापड चाट बनवण्यासाठी कैरी, लाल तिखट, पापड, मीठ, कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला, हिरवी मिरची आणि शेव इत्यादी साहित्य लागते.
कैरीचे पापड चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम पापड हलका भाजून त्यांचा कोन बनवून घ्या.
एका बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो, कैरी, लाल तिखट, चाट मसाला आणि हळद टाकून मिक्स करून घ्या.
यात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा.
चाट चटपटीत करण्यासाठी लिंबाचा रस यात पिळा.
तयार मिश्रण पापडच्या कोनमध्ये भरा.
अशाप्रकारे कुरकुरीत कैरी-पापड चाट तयार झाला आहे.
तुम्ही यात डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकता.