Shreya Maskar
कैरीची डाळ बनवण्यासाठी तूरडाळ, मुगडाळ , कैरी, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मोहरी, जिरे, लाल तिखट, हळद, गूळ, तेल, हिंग, मीठ आणि मिरची इत्यादी मसाले लागतात.
कैरीची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मुगडाळ, तूरडाळ पाण्यात भिजत ठेवा.
आता यात टोमॅटो, मिरची बारीक कापून डाळ कुकरमध्ये उकडून मॅश करून घ्यावी.
डाळीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, हिंग, जिरे, लसूण आणि कढीपत्ता टाकावा.
फोडणी चांगली तडतडू लागल्यावर त्यात हळद, लाल तिखट घालून मिक्स करून घ्या.
आता बारीक कापलेली कैरी डाळीमध्ये टाकून तिला फोडणी द्या.
शेवटी डाळीमध्ये चवीनुसार मीठ, गूळ आणि कोथिंबीर टाका.