Manasvi Choudhary
आबंट- गोड कच्ची कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
उन्हाळा सुरू झाला की कच्ची कैरी खाण्याचे वेध सर्वांना लागतात.
कैरीमध्ये मीठ, मसाला लावून आंबट लोणचे खाणे सर्वच पंसत करतात.
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची कच्ची कैरी खा.
कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबर असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कैरी खाल्ल्यानं पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच प्रेग्नन्सी मॉर्निंग सीकनेस आणि मळमळ जाणवत असल्यास कैरीचे सेवन करा.
कैरीचं पन्ह उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे परिणाम कमी होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या