Manasvi Choudhary
गाबा कसोटी सामना अनिर्णित सुटला. अखेरच्या दिवशी अश्विन यानं निवृत्तीची घोषणा केली.
आर. अश्विन यानं ६ नोव्हेंबर २०११ रोजी वेस्ट इंडिजविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाहूयात अश्विन यानं कोण कोणते विक्रम केले.
आर. अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे.
आर. अश्विन यानं कसोटीमध्ये ५३७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये सातव्या क्रमांकावर
एका डावात पाच विकेट घेण्याचा विक्रम अश्विनने ३७ वेळा केला आहे. या विक्रमात अश्विन दुसऱ्या क्रमांकावर
आशिया खंडात सर्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने भारतीय उपखंडात ४२४ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अनिल कुंबळेंच्या नावावर ४१९ विकेट आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिन्ही एडिशनमध्ये प्रत्येकवेळा ५० विकेट घेण्याचा पराक्रम अश्विनच्या नावावर आहे.