Shreya Maskar
रव्याच्या लाडू बनवण्यासाठी रवा, दूध, तूप, मलई, ड्रायफ्रूट्स, सुके खोबरे, वेलची पावडर, केशर आणि पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते.
रव्याच्या लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम रव्यात गुठळ्या राहू नयेत म्हणून रवा तुपात चांगला भाजून घ्या.
रवा गोल्डन फ्राय झाला की त्यात खोबऱ्याचा किस घाला.
या मिश्रणात आता थोडा साखरेचा पाक घाला.
त्यानंतर मिश्रणात मलाई आणि बारीक ड्रायफ्रूट्स टाकून एकजीव करून घ्या.
शेवटी गॅस बंद करून यात वेलची पावडर आणि केशर टाका.
केशरमुळे रव्याला छान रंग येईल.
आता हलक्या हाताने लाडू छान वळून घ्या.