Shreya Maskar
वांग्याचे काप बनवण्यासाठी काळ्या रंगाचे वांग, हळद, लाल तिखट, गरम मसाला, बेसन पीठ, रवा, जिरे पावडर, धणे पावडर, तेल, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
वांग्याचे काप बनवण्यासाठी वांग स्वच्छ धुवून त्याच्या गोलाकार चकत्या करा.
आता एका ताटात हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, कोथिंबीर आणि मीठ हे मिक्स करून घ्या.
वांग्याचे काप तयार मसाल्यात घोळवून घ्या.
दुसऱ्या ताटात बेसन, रवा आणि चिमूटभर मीठ मिक्स करून घ्या.
मसाल्याच्या वांगेचे काप रव्यात घोळवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून वांग्याचे काप गोल्डन फ्राय करून घ्या.
खरपूस वांग्याच्या कापांचा गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या.