Shreya Maskar
मेथी पिठलं बनवण्यासाठी बेसन पीठ , मेथी , कांदा, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मोहरी, जिरे, हिंग, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ आणि लाल तिखट मसाला इत्यादी मसाले लागते.
मेथी पिठलं बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात पाणी मिक्स करून काही वेळ ठेवून द्या.
आता पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, हिंग, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, हळद, मीठ घालून फोडणी तयार करून घ्या.
या फोडणीत बारीक चिरलेली मेथी टाका.
मेथीला छान पाणी सुटल्यावर त्यात बेसन पीठ आणि फोडणी टाकून मिक्स करा.
आता पिठलं घट्ट होईपर्यंत छान ढवळत रहा.
आता पुन्हा छोट्या पॅनमध्ये तेल, लाल तिखट मसाला, लसूण टाकून फोडणी तयार करून पिठल्यावर टाका.