Rava Ladoo: घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा रव्याचा लाडू; तोंडात टाकताच विरघळेल

Siddhi Hande

रव्याचे लाडू

रव्याचे लाडू तर सर्वांनाच आवडतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात रव्याचे लाडू बनवले जातात.

Rava Ladoo | Google

रेसिपी

रव्याचे लाडू बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. लाडू बनवण्यासाठी जास्त वेळदेखील लागत नाही.

Rava Ladoo | Google

साहित्य

बारीक रवा, पीठीसाखर, तूप, वेलची पूड, सुकामेवा

Rava Ladoo | Google

तूप

सर्वात आधी कढईत १-२ तूप टाका. मंद आचेवर रवा १०-१५ मिनिटे खरपूस भाजून घ्या.

Rava Ladoo | Google

रवा भाजून घ्या

रवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. त्याचा छान सुवास सुटणे गरजेचे आहे.

Rava Ladoo | Google

रवा

यानंतर भाजलेला रवा एका ताटात काढा. त्यानंतर परत तूप टाकून त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्या.

Rava Ladoo | Google

सुकामेवा

यानंतर भाजलेल्या रव्यात पिठीसाखर, वेलची पूड, सुकामेवा टाकून मिक्स करा.

Rava Ladoo | Google

लाडू वळून घ्या

यानंतर मिश्रण कोमट असतानाच त्याचे लाडू वळून घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावा.

Rava Ladoo | Google

Next: नेहमीची हिरवी चटणी नकोय? मग ट्राय करा 'कैरीची लाल चटणी'; न खाणारेही खातच राहतील

Green Mango Chutney
येथे क्लिक करा