Manasvi Choudhary
उन्हाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी तुम्ही जेवणात कैरीची चटणी खाऊ शकता.
हिरव्या कैरीची हिरवी चटणी तुम्ही पाहिली असेल, पण तुम्ही कधी लाल चटणी पाहिले का?
कैरीची लाल चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. हिरव्या कैरीपासून लाल चटणी कशी बनवण्याची हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कैरीची लाल चटणी बनवण्यासाठी कैरी, शेंगदामे, जिरे, आलं, मसाला, मीठ, गूळ, कडुलिंबाची पाने हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी कैरीचे सालीसकट बारीक तुकडे करा. नंतर मिक्सरच्या भांडयामध्ये कैरी बारीक वाटून घ्या.
वाटलेल्या कैरीच्या मिश्रणात गूळ घालून मिक्स करा म्हणजे चटणीला आंबट- गोड चव येईल.
त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कडुलिंबाची पानांची फोडणी देऊन चटणीचे मिश्रण मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी कैरीची लाल आंबट- गोड चटणी तयार होईल.