Shruti Vilas Kadam
१ कप बारीक रवा, ¾ कप साखर, ¼ कप साजूक तूप, ¼ कप दूध, १ टेबलस्पून खोबरं (सुके किसलेले), वेलदोड्याची पूडकाजू व मनुका
कढईत थोडं तूप टाकून रवा मंद आचेवर खमंग सुवास येईपर्यंत भाजा. रवा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या.
दुसऱ्या बाजूने किसलेलं खोबरं व काजू, मनुका थोड्याशा तुपात परतून बाजूला ठेवा.
साखर मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या. ही साखर रव्याच्या मिश्रणात मिसळायची आहे.
भाजलेला रवा, खोबरं, सुकामेवा, वेलदोड्याची पूड आणि साखर सर्व एकत्र मिसळा.
थोडं थोडं गरम दूध घालत जाऊन लाडवांसाठी गोळे वळा. लाडू फार ओले होणार नाहीत याची खबरदारी घ्या.
लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. हे लाडू ५–६ दिवस टिकतात.