Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात सणासुदीला विविध गोड पदार्थ बनवले जातात.
रवा लाडू घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
रवा लाडू बनवण्यासाठी रवा पिठीसाखर, साजूक तूप, काजू- बदाम, वेलची पावडर, मनुके हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका कढईमध्ये साजूक तूपमध्ये रवा खरपूस भाजून घ्या
यानंतर रवा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढा. आणि त्यात पिठीसाखर, काजू-बदाम, वेलची पावडर मिक्स करा.
सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे गोलाकार लाडू वळून घ्या.
लाडू वळताना त्याला मनुके लावून सजवू शकता.
अशाप्रकारे रव्याचे लाडू खाण्यासाठी तयार होतील.