Shreya Maskar
रवा खांडवी बनवण्यासाठी रवा, दही, आलं-लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, साखर, तेल, मोहरी, हिंग, पाणी, मीठ, खोबरे आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
रवा खांडवी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात रवा, दही मिक्स करून ५ मिनिटे ठेवा.
मिश्रणात आलं-लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, साखर, मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करा.
मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
तयार मिश्रण ताटात छान पसरवून ५ मिनिटे ठेवून द्या.
मग मिश्रणाच्या वड्या पाडून गोल सुरळी करून घ्या.
छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
रवा खांडवीवर कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे टाकून सजवा.